
Indian Navy : नौदल डाॅकयार्डमधील गौरव पाटील या प्रशिक्षणार्थीला अटक
Continues below advertisement
Indian Navy : नौदल डाॅकयार्डमधील गौरव पाटील या प्रशिक्षणार्थीला अटक भारतीय नौदलाच्या जहाजांची नावं, ठिकाणं पाकिस्तानी गुुप्तचरांना पुरवणाऱ्याला नौदल डॉकयार्डमधून अटक झालीय. २३ वर्षांचा आरोपी गौरव पाटील हा नौदल डॉकयार्डमध्ये प्रशिक्षणार्थी होता. आर्थिक फायद्यासाठी तो नौदलाची ही माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवत होता. पाकिस्तानच्या किमान तीन गुप्तहेर अधिकाऱ्यांना त्याने ही माहिती पुरवल्याचं उघड झालंय. मे महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मुक्ता महातो, पायल एंजल आणि आरती शर्मा या कथित व्यक्तींना दिली. व्हॉट्सअॅपवर मुक्ता महातो, पायल एंजल, आरती शर्मा या बनावट प्रोफाईल वापरणाऱ्या गुप्तहेरांना तो ही माहिती देत होता.
Continues below advertisement