Indian Navy : भारतीय नौदलाकडून 35 समुद्री चाच्यांना अटक, 40 तास सुरू होतं ऑपरेशन
Continues below advertisement
Indian Navy : भारतीय नौदलाकडून 35 समुद्री चाच्यांना अटक, 40 तास सुरू होतं ऑपरेशन
भारतीय नौदलानं पुन्हा एकदा त्यांच्या कीर्तीला साजेशी उत्तम कामगिरी बजावली आहे. भारतीय समुद्राकिनाऱ्यापासून दोन हजार ६०० किलोमीटवर केलेल्या एका ऑपरेशनमध्ये नौदलानं ३५ समुद्री चाच्यांना अटक केली. तब्बल ४० तास हे ऑपरेशन सुरू होतं. माल्टा देशाचं व्यापारी जहाज MV RUEN समुद्री चाच्यांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं. याची खबर १५ मार्च रोजी भारतीय नौदलाची युद्धनौका INS कोलकाताला मिळाली. तेव्हापासून भारतीय नौदलाची या जहाजावर नजर होती. नौदलानं ड्रोन पाठवलं होतं, पण हे ड्रोन या चाच्यांनी हाणून पाडलं. त्यानंतर नौदलानं C-16 हेलीकॉप्टरच्या सहाय्यानं मरीन कमांडो पाठवले, आणि तब्बल ४० तासांनी सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली.
-----
Continues below advertisement