10 Lakh Govt. Jobs : दीड वर्षांत 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध, पाहा कोणत्या खात्यात आहे नोकरीची संधी
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर गेले काही दिवस राजकीय बातम्यांचा ओघ सुरु आहे... मात्र तूर्त राजकारण थोडसं बाजूला ठेवून कामाची बातमी पाहुयात.. बातमी आहे सरकारी नोकरीची... नव्हे तर 10 लाख नोकऱ्यांची.. येत्या दीड वर्षांत 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे.. विशेष करून या सरकारी नोकऱ्या रेल्वे, पोस्ट, संरक्षण क्षेत्र आणि गृह खातं या विभागातील असतील.. याशिवाय आयएएस दर्जाची 1 हजार 472 पदं तर आयपीएस दर्जाची 864 पदं रिक्त असून ती देखील लवकरच भरली जातील अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
Continues below advertisement