Wheat : गहू निर्यात बंदी शिथिल करण्याचा निर्णय; 13 मे पर्यंत नोंदणी केलेल्या मालास परवानगी
Continues below advertisement
केंद्र सरकारने गहू निर्यातबंदीच्या निर्णयातून काहीशी शिथिलता दिली आहे. १३ मेपर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला गव्हाचा साठा पुढे पाठवण्यास केंद्र सरकारने परनागी दिली आहे. तर, 13 मे किंवा त्यापूर्वी सीमाशुक्ल विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेला गहू देखील देशाबाहेर पाठवण्यात येणार आहे. तसंच इजिप्तच्या मार्गावर असलेला गव्हाचा साठाही पुढे पाठवण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यामुळे गहू निर्यातदारांना मोठा दिलासा मिळात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा पुरवठा विस्कळीत झालाय. तसंच चीनमध्ये आलेल्या पुरामुळे देखील गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर वाढलेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताने गव्हाची निर्यात बंद करण्यात निर्णय घेतला.
Continues below advertisement