India Air Travel : देशात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली
Continues below advertisement
हवाई प्रवासाबाबत आणखी एक चांगली बातमी आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर देशात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता वाढली आहे. गेल्या रविवारी तब्बल ३ लाख ७० हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. ही संख्या पाहता हळूहळू परिस्थिती कोरोनापूर्व काळाप्रमाणे पूर्वपदावर येऊ लागल्याचं दिसून येतंय. दोन वर्षांपूर्वी देशात रोज सरासरी ४ लाख २० हजार प्रवासी हवाई प्रवास करत होते. त्या तुलनेत आता होत असलेली वाढ हवाई वाहतूक क्षेत्रासाठी दिलासादायक आहे.
Continues below advertisement