Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : भारतासाठी ऐतिहासिक दिवस,अॅक्सियम ४ मोहिमेची यशस्वी सुरुवात
एक्सीयम फोर मोहिमेअंतर्गत भारताचे शुभांशु शुक्ला यांसह चार अंतराळवीर अवकाशात झेपावले. फाल्कन नऊ रॉकेटने ड्रेगन स्पेसक्राफ्टसह यशस्वी उड्डाण केले. शुक्ला यांनी अवकाशातून पहिला संदेश पाठवला, म्हणाले, 'माझ्या कांध्यावर माझा तिरंगा आहे जो मला सांगतोय की मी एकटा नाहीये मी तुमच्या सर्वांसोबत आहे.' पुढील १४ दिवस ते अंतराळात राहणार आहेत. शुक्ला यांच्याकडे २००० तासांचा उड्डाण अनुभव असून ते भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेत.