भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार, नवा युनिफॉर्म कसा असेल, त्याची वैशिषट्यं काय असतील?

Continues below advertisement

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश आजपासून बदलणार आहे. हवामानापासून संरक्षण आणि सैनिकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर योग्य असा पोशाख तयार करण्यात आलाय. आर्मी डे परेडदरम्यान नव्या गणवेशाचा पहिला लूक पाहायला मिळणार आहे.  मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे केलीय.आतापर्यंत तीन वेळा भारतीय लष्कराचा गणवेश बदलण्यात आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले. नंतर 1980 मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले. शेवटचा बदल 2005 मध्ये करण्यात आला. सरकारने CRPF आणि BSF च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram