Indian Air Force News : भारतीय वायूदलाची मोठी कारवाई, तीन अधिकारी बडतर्फ
Continues below advertisement
मार्च महिन्यात घडलेल्या ब्रह्मोस मिसफायर प्रकरणी भारतीय वायूदलानं मोठी कारवाई केलेय... घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर वायूदलाच्या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. याच वर्षी मार्चमध्ये भारताचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र काही चुकीमुळे पाकिस्तानच्या हद्दीत पडलं होतं... लाहोरपासून २७५ किलोमीटर्सवर पडलेल्या या क्षेपणास्त्रामुळे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती मात्र काही इमारतींचं नुकसान झालं होतं. भारतानं त्यानंतर या घटनेची दखल घेत एअर मार्शल आर. के. सिन्हा यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली... त्यांनी केलेल्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आलेय.
Continues below advertisement