5G in India : भारतात लवकरच 5G सेवा! एप्रिल-मे महिन्यात 5 जी कंत्राटांच्या लिलावाची शक्यता
येत्या 66 महिन्यात संपूर्ण भारतात 5 जी सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्यात 5 जी कंत्राटांचा लिलाव प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जातेय. टेलिकॉम क्षेत्रातील 35 निर्मात्यांनी या लिलावासाठी अर्ज केलाय. या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आग्रही असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी वैष्णव यांनी पुढील 2-3 वर्षांमध्ये टेलिकॉम वि्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिलेत.