India Vs England : बुमराच्या 6 विकेट्सनी इंग्लंडला 253 वर रोखलं, दुसऱ्या दिवसाअखेर भारत बिनबाद 28
India Vs England : बुमराच्या 6 विकेट्सनी इंग्लंडला 253 वर रोखलं, दुसऱ्या दिवसाअखेर भारत बिनबाद 28
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळे विशाखापट्टणम कसोटीत भारताने इंग्लंडला पहिल्या डावात २५३ वर रोखलं. एका वेळी एक बाद ११४ अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लिश आर्मीला बुमराच्या अफलातून स्पेलने ब्रेक लावला. पोप, रुट, बेअरस्टो आणि स्टोक्स या चार मोहऱ्यांना टिपत त्याने इंग्लिश फलंदाजीचं कंबरडं मोडलं. बुमराने ४५ धावांच्या मोबदल्यात एकूण सहा फलंदाज तंबूत परतवले. फिरकीपटू कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा झॅक क्राऊली ७६ आणि कर्णधार स्टोक्सच्या ४७ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता इतर मोठी खेळी कुणालाही करता आली नाही. भारताने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्यात. खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल १५ तर रोहित शर्मा १३ धावांवर खेळत होते. भारताची एकूण आघाडी आता १७१ ची झालीय.