India Under 19 World Cup : भारताची अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia Under 19 World Cup : भारताची अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक ABP Majha
भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात चेंडू आणि दोन विकेट्स राखून पराभव करत अंडर नाईन्टिन विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. बेनोनीमधल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी ५० षटकांत २४५ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं ४८ षटकं आणि पाच चेंडूंमध्ये विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. बीडचा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या १७१ धावांच्या भागिदारीनं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्या दोघांनी चार बाद ३२ अशा केविलवाण्या परिस्थितीतून भारतीय संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. सचिन धसनं ९५ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ९६ धावांची खेळी उभारली. उदय सहारननं १२४ चेंडूंत सहा चौकारांसह ८१ धावांची खेळी केली. अंडर नाईन्टिन विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, ११ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या उपांत्य फेरीतला विजयी संघ भारताविरुद्ध अंतिम फेरीत खेळेल.