India vs Canada : कॅनेडा सरकारला भारताचा धक्का, खलिस्तानी अधिकऱ्यांना पाठीशी घातल्यानं निर्णय
Continues below advertisement
खलिस्तानी अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या कॅनडा सरकारनं चांगलाच दणका दिला आहे. पुढील सूचनेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणं भारत सरकारनं बंद केलं आहे. दोन दिवसांपूर्वी कॅनडानं भारताच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. गुप्तचर विभागात काम करणाऱ्या .या अधिकाऱ्याचं नाव देखील कॅनडानं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अशा अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करणं निषिद्ध मानलं जातं. तरीही, जस्टीन त्रुदो यांच्या सरकारनं हा पोरकटपणा केला, त्य़ाला आता भारत सरकारनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Continues below advertisement