India Population : भारतानं केलं चीनला ओव्हरटेक, लोकसंख्येत टाकलं मागे ABP Majha
Continues below advertisement
अखेर भारतानं नंबर एकला असलेल्या चीनला मागे टाकलंय... पण लोकसंख्येत.... जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ही आता भारताची ओळख बनलीय... आज भारताची लोकसंख्या आहे 142 कोटी 86 लाख... तर दुसऱ्या क्रमांकावरील चीनची लोकसंख्या आहे 142 कोटी 57 लाख... जगाची एकूण 800 कोटींची लोकसंख्या लक्षात घेतली तर भारत आणि चीनची मिळून लोकसंख्या जगाच्या एक तृतीयांश आहे... एप्रिलमध्ये भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकेल, असा अंदाज यंदा फेब्रुुवारीमध्येच संयुक्त देशांनी वर्तवला होता... भारताची लोकसंख्या जगात भारी झाल्यानंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वधर्मियांसाठी कायदा बनवावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलीय...
Continues below advertisement