India Coronavirus update | कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या क्रमांकावर
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता या महामारीमुळे बाधित रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 90 हजार 535 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.