India Coronavirus Update : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; 24 तासांत 2 लाख नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण भारतात आढळून येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांचा आकडा आता दोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,00,739 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 1038 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 93,528 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी मंगळवारी 184372 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Tags :
India Coronavirus Update Corona In India India Coronavirus Covid-19 In India COVID-19 In India