Nitish Kumar PM Offer : INDIA Alliance कडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर : KC Tyagi

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीनेही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. तर, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आपणच सरकार स्थापन करणार आहोत, असे भाजप (BJP) नेत्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, आता भाजपच्यावतीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जून रोजी मोदी पंतप्रधानपदासाठी शपथ घेतील, अशी माहिती आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनही मोठं पॅकेज दिलं जाणार असल्याचे समजते.  

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे, जवळपास मोदींच्या शपथविधीचं निश्चित झालं आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या पक्षाचं समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. सर्वाचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरू भाजपाकडून सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपसमवेतच्या सर्वच घटकपक्षांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.  

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 9 जून रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी जाणार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज दिल्लीमध्ये एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram