India Alliance : 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक, 5 राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणार
Continues below advertisement
India Alliance : 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक,5 राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणार
१९ डिसेंबरला राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत माहिती दिलीय. ६ डिसेंबर रोजी ही बैठक होणार होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आजारपण आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या व्यस्ततेमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता सर्व नेत्यांशी समन्वय साधून या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भातही मंथन होणार आहे.
Continues below advertisement