INDIA Alliance and NDA Meeting : दिल्लीत इंडिया आघाडी आणि एनडीएच्या बैठकी, घडामोडींना वेग

Continues below advertisement

INDIA Alliance and NDA Meeting : दिल्लीत इंडिया आघाडी आणि एनडीएच्या बैठकी, घडामोडींना वेग

Lok Sabha Election Result 2024 LIVE: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) निकाल लागले आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर एनडीएनं (NDA) बहुमताचा आकडा ओलांडला आहे, पण भाजप (BJP) स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असं दिसत नाही. निवडणूक निकालांनुसार, एनडीए 291 जागांसह आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीला (India Alliance) आतापर्यंत 234 जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप 400 चा आकडा पार करण्याचा दावा करत होतं, याउलट इंडिया आघाडी मोठ्या राज्यांमध्ये आपला प्रभाव पाडताना दिसलं. 

उत्तर महाराष्ट्र आणि बंगाल... तिन्ही राज्यात NDAच्या वियजी रथाला ब्रेक 

पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये एनडीएला मोठा धक्का बसला आहे. या तिनही राज्यांमध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळालं असतं, तर आज देशातील चित्र फारच वेगळं दिसलं असतं. या तिन राज्यांत एनडीएच्या उमेदवारांना यश मिळालं असतं, तर पंतप्रधान मोदींचा विजय रथ कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे गेला असता, यात काही शंकाच नाही. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram