India Alliance Mumbai Meeting : इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर-सूत्र
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 08:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर पडण्य़ाची शक्यता आहे. आधी ही बैठक २५ आणि २६ ऑगस्टला ठरली होती, आता मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलंय. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. कारण १६ ऑगस्ट रोजी थोरले पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती आहे.