IND vs NZ World Cup : वन डे विश्वचषकाच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारण्याची भारताची ही चौथी वेळ
रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान ७० धावांनी मोडूत काढून वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. वन डे विश्वचषकाच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी तब्बल ३९८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डॅरील मिचेलनं खणखणीत शतक झळकावलं. मिचेलनं ११९ चेंडूंत १३४ धावांची झुंजार खेळी उभारली. त्यानं कर्णधार केन विल्यमसनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारीही रचली. पण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं याही सामन्यात कमाल केली. त्यानं न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना माघारी धाडून सामना भारताच्या बाजूनं झुकवला. न्यूझीलंडचा अख्खा डाव ३२७ धावांत आटोपला.
Tags :
Final Century Team India Wankhede Stadium Mohammed Shami Rohit Sharma Daryl Mitchell MUMBAI ODI World Cup Challenge New Zealand