Imtiaz Jaleel | आज मशिदीत जाणार नाही, पण आंदोलन सुरुच ठेवणार : इम्तियाज जलील
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी सोडलं आहे. मंदिर-मशिदीत प्रवेश झाला नाही म्हणजे आंदोलन स्थगित केलं असं नाही. हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटलं. शहागंज मशिद प्रवेशासाठी निघाले असताना इम्तियाज जलील यांना आज दुपारी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलं होतं. या मशिदीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.