IGLU CAFE : कश्मीरमध्ये जगातील सर्वात मोठे इग्लू कॅफे; 37. 5 फूट उंच, पर्यटकांना पर्वणी

यानंतर आपण अशा एका कॅफेमध्ये जाणार आहोत, ज्याची दृश्यं पाहिल्यानंतर तुम्हाला तिथे जाण्याचा मोह आवरणार नाही... हे आहे काश्मीरच्या गुलमर्गमधील इग्लू कॅफे... तब्बल 37 फूट उंच असलेलं हे कॅफे जगातलं सर्वात मोठं इग्लू कॅफे असल्याचा दावा करण्यात आलाय. सय्यद वसीम शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे. 20 जणांच्या टीमने दोन महिन्यांत स्नोग्लू तयार केला आहे. त्यातील खुर्च्या आणि टेबल सगळंच बर्फाचे आहे. त्यावर मेंढीचे कातडे घातलेले आहे. आतमध्ये कश्मिरी हस्तकलेचे दर्शन घडवण्यात आले आहे. बर्फाचे घर बघण्यासाठी पर्यटकांची पावले स्नोग्लूकडे वळत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola