ICICI Bank loan fraud: वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल
ICICI बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर कर्ज फसवणूकप्रकरणी कडक कारवाई करण्यात आलीये.. सीबीआयने चंदा कोचर, दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात याशिवाय आणखी सहा जणांची नावे आहेत. वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती असे या सीबीआयचे म्हणणे आहे.