Rape in India | 'रेप इन इंडिया' प्रकरणी मी कधीच माफी मागणार नाही : राहुल गांधी | ABP Majha

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सर्व महिला खासदारांनी केली आहे. मात्र यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कठोर प्रतिक्रिया दिला आहे. मी माफी मागणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ईशान्य भारत पेटवला आहे. या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मला लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय मोदींनी यापूर्वी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल केला होता, असंही त्यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola