Hyderabad IB Officer Dead | कुटुंबासमोरच IB अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या; दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा

Hyderabad IB Officer Dead | कुटुंबासमोरच IB अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या; दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा 

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटना म्हणजे IB मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे. 

गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे. 

गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली.  

Pahalgam Terror Attack : आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतर हा एक मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola