Hyderabad Fire : हैद्राबादमध्ये अग्नितांडव, भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 11 जणांचा मृतदेह

Continues below advertisement

Hyderabad Fire Update : हैदराबादमधील भोईगुडा आडी येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मजूर गोदामात झोपले होते. भीषण आग लागल्यामुळे एक भिंत कोसळली, त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या एक जणाला बचावण्यात आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले. आग विझवण्यात आली आहे, मात्र काही जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रद्दी गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram