Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप
Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (SEBI chief Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी (Adani) घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक (Investment) असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. मात्र, माधवी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप बिनबुडाचे आणि नाराधार असल्याचे पुरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चच्या म्हणण्यानुसार, माधवी पुरी आणि त्यांचे पतीने मॉरिशस आणि बर्म्युडामधील ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा आरोप हिंडनबर्गने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, माधवी पुरी बुच यांनी दाम्पत्याकडे अस्पष्ट ऑफशोअर फंड बर्म्युडा अॅन्ड मॉरिशस फंडमध्ये छुपी भागीदारी होती. या फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. आयआयएफएल प्रकटीकरणातून बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती ही 10 दशलक्ष डॉलर असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही हिंडनबर्गने अदानी समुहावर आरोप केले होते. मात्र, अदानी समुहानं ते फेटाळून लावले होते. नेमका काय आहे दावा? सिंगापूर येथील अगोरा पार्टनर्स नावाने एका कन्सल्टिंग फर्ममध्ये माधवी यांचा 100 टक्के वाटा होता. सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी पुरी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरीत केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांची ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी होती, ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला होता असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं हिंडनबर्गनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय. यावर बोलताना पुरी म्हणाल्या की, आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत. गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेलीय. कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही असं त्या म्हणाल्या.