Himachal Pradesh : लाहोल - स्पितीमध्ये पारा शून्याखाली ABP Majha
थंडीच्या लाटेमुळे हिमाचल प्रदेशच्या लाहुल-स्पितीमध्ये तापमानाचा पारा शून्याखाली खूपच घसरलाय इथे तापमान उणे १५ ते २० अंशांपर्यंत नोंदवण्यात आलंय. हाडं गोठवणाऱ्या या थंडीमुळे या भागातले नैसर्गिक जलस्त्रोतही गोठले आहेत. पर्यटक जरी या थंडीची मजा लुटत असले तरी जनजीवन मात्र थंडीमुळे काहीसं विस्कळीत व्हायला लागलंय.