Himachal Winter : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, तीन राष्ट्रीय महामार्गांसहीत तब्बल 685 मार्ग बंद
हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसहीत तब्बल 685 मार्ग बंद होते. शिमला, लाहुल स्पिती, चंबा, किन्नौर, सिरमौर, सोलन या भागात रस्ते बंद असल्यानं स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडतेय. थंडीमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झालंय. पाईपलाईन्स गोठल्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही अनेक भागात प्रश्न आहे. सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे परिसरात हाडं गोठवणारी थंडी आहे. चंबा डलहौसी मध्ये तापमान शून्याखाली घसरलंय तर मनाली-शिमलामध्ये तापमान शून्य अंशांवर आलंय.