Himachal Flood : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत

Continues below advertisement

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. 

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुदेश कुमार मोख्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिति जिल्ह्यात ढगफुटीमुळं अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. त्यासोबतच चंबा जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची सूचना मिळत आहे. 

त्यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री जवळपास आठ वाजता लाहौलमधून उदयपूरमध्ये ढगफुटी झाली. मजुरांचे दोन तंबू आणि एक जेसीबी मशीन पाण्यात वाहून गेली. मुळच्या जम्मू-काश्मीर येथील रहिवाशी असणआऱ्या 19 वर्षीय श्रमिक मोहम्मद अल्ताफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram