Himachal Landslide : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू ABP Majha

Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये मोठा अपघात झाला आहे. सांगला खोऱ्यात दरड पुलावर कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. किन्नौर जिल्हा एसपी साजू राम राणा यांनी सांगितले की, नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी पूल कोसळला असून बचाव दल घटनास्थळी हजर असल्याचे एसपीने सांगितले.

सांगला येथे जाणाऱ्या पर्यटकांचे वाहन भूस्खलनाच्या कचाट्यात सापडले. हे पर्यटक छत्तीसगडचे असल्याचे सांगितले जात आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. डोंगरावरुन मोठे दगड घसरत पुलावर आदळले. तिथं सुरू असलेल्या बांधकामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचीही माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात याचे भयानक दृश्य कैद केलंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola