Heron Mark 2: भारताच्या उत्तर सिमेवर भिरभिरणार 'हेरॉन मार्क 2'
Heron Mark 2: भारताच्या उत्तर सिमेवर भिरभिरणार 'हेरॉन मार्क 2' हवाई दल अत्याधुनिक क्षेपणास्त्रांवर वेगानं काम करताना दिसतंय. मिग २९ या लढाऊ विमानांची एक तुकडी काश्मीरच्या श्रीनगर बेसवर तैनात केल्यावर आता भारतानं पाकिस्तान आणि चीन सीमा भागासाठी आता इस्रायली बनावटीचे ड्रोन तैनात केलेत. हेरॉन मार्क २ असं या ड्रोनचं नाव आहे. हे ड्रोन 35 हजार फूट उंचीपर्यंत 150 नॉट्सच्या वेगाने उडू शकतात. एका फेरीत 36 तास उड्डाणाची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. तसंच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो.