Jammu Kashmir Snowfall : जम्मू काश्मीरमध्ये वेळेआधीच बर्फवृष्टी, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये वेळेआधीच या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. काश्मीर आणि परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस आणि त्याैात आता सुरु झालेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्राल परिसरात भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला असून बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीलाही फटका बसला आहे. रस्त्यावर बर्फ जमा झाल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यानं जम्मू-श्रीनग राज्य महामार्ग ठप्प झाला आहे. एकीकडे बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. बर्फवृष्टी सुरु झाल्याने पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास त्यांना वाटतोय.
Continues below advertisement