Qutab Minar परिसरात हिंदूंना पूजेचा देण्याची मागणी, साकेत कोर्टात सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात आज सुनावणी होणार आहे. वाराणसीतील ज्ञानवापीच्या वादानंतर देशातील अन्य काही धार्मिक स्थळांबाबतही वाद पुढे आलाय आणि हा वाद कोर्टात गेलाय. कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ आहे आणि या परिसरात शिव, गणेश, सूर्य, देवी गौरी यांच्यासह काही जैन मंदिरं होती, असा दावा करण्यात येतोय. २७ हिंदू आणि जैन मंदिरांना उध्वस्त करुन त्याच सामानातून मशिद उभारण्यात आली, असाही दावा केला जातोय. या वादावर कोर्टात आज सकाळी सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement