Anil Vij Corona Positive | कोवॅक्सिन घेतलेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण
कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनलेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनिल विज यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असून उपचारांसाठी अंबाला कँटमधील सरकारी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अनिल विज यांनी सांगितलं. "माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: कोरोना चाचणी करावी," असं आवाहनही त्यांनी केलं आहे.