Haryana :हरियाणाच्या हाॅटेलमध्ये माऊथ फ्रेशनर ऐवजी ड्राय आईस दिला आणि तोंडातून रक्त आलं !

Continues below advertisement

Haryana :हरियाणाच्या हाॅटेलमध्ये माऊथ फ्रेशनर ऐवजी ड्राय आईस दिला आणि तोंडातून रक्त आलं ! आपल्याकडे रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणानंतर माऊथ फ्रेशनर दिले जाते. पण, ते खरच माऊथ फ्रेशनर आहे का हे तापसून घेतले पाहिजे. माऊथ फ्रेशनर खाऊन अचानक तोंडातून रक्त येऊ लागेल, हरियाणातील गुरुग्राममध्ये एक अशी घटना समोर आली आहे. माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर ५ जणांची प्रकृती बिघडली... यामुळे या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यातील दोन जण अत्यवस्थ असल्याचे अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंट विरोधात आरोप केले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता अंकित कुमार त्याच्या पत्नी आणि मित्रांसह गुरुग्रामच्या खेरकिदौला सेक्टर ९० मधील लाफोरेस्टा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्रीच्या जेवणानंतर त्यांना माउथ फ्रेशनर देण्यात आले. ते खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाचही लोक काहीतरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालेले दिसत आहेत. काहीतरी खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडून रक्त येत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram