Hamid Ansari | देशाला 'धार्मिक अतिरेक', 'प्रखर राष्ट्रवादाचा' धोका : हमीद अन्सारी

Continues below advertisement
"कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे," असं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केलं आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग' या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशाच्या वेळी ते बोलत होते. "कोविड अतिशय वाईट महामारी आहे परंतु याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे," असं अन्सारी म्हणाले. तसचं "धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादापेक्षा देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

हमिद अन्सारी म्हणाले की, "आज आपला देश कोरोनाव्हायरसच्या महामारीशिवाय आणखी दोन महामारींचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा या महामारींचा धोका अधिक दिसत आहे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासलं आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे. देशप्रेम हे सैन्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त संरक्षणात्मक आहे."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram