Gyanvapi Case : ज्ञानवापीसंदर्भात चाललेल्या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पुर्ण : ABP Majha
वाराणसीमध्ये ज्ञानवापीसंदर्भात चाललेल्या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पुर्ण झाला आहे. एएसआयच्या टीमकडून ज्ञानवापी येथं सध्या सर्वेक्षण सुरू आहे. ज्ञानव्यापीच्या जागेत ४ फुटांची मूर्ती मिळाली असा दावा हिंदू पक्षानं केलाय. तसेच, मुर्तीवर काही कलाकृती आहे असही हिंदू पक्षाने सांगितलय. आता या मुर्तीची पाहणी करत ती कोणत्या काळातील असावी याचा तपास सुरू करण्यात आलाय.