Gummadi Vittal Rao Passes Away : क्रांतिकारी गीतकार गुम्मडी विठ्ठल राव उर्फ 'गद्दार' यांचं निधन
क्रांतिकारी गीतकार म्हणून प्रख्यात असलेले 'गद्दार' आपल्यात राहिले नसून त्यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असे होते. पण, गद्दार म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, १९८० च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गद्दार हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते.
Tags :
Telangana