Valsad Fire | वलसाडच्या तलवाडामध्ये प्लायवूड उत्पादक कंपनीत भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात भिलाड जवळील राष्ट्रीय महामार्गावरील तलवाडा गावात प्लायवूड उत्पादक कंपनीला रात्री भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टायमॅक्स प्लायवूड कंपनीला ही भीषण आग लागली आहे. रात्रीची आग अजूनही सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड आणि प्लायवूड साहित्यांना आग लागली.