Gujrat Lion: गीरमध्ये सध्या 736 सिंह असल्याचा अंदाज, बुद्ध पौर्णिमेला सिंहांची गणना ABP Majha

गुजरातच्या गीर अभयारण्यात गेल्या दोन वर्षात सिंहांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे. सध्या या अभयारण्यात एकूण ७३६ सिंह असल्याचा अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे. बुद्ध पौर्णिमेला चंद्र प्रकाशात सिंहांची गणना कऱण्यात आली. त्या आधारे सिंहांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. २०१५मध्ये झालेल्या गणनेत गीरमध्ये ५११ सिंह होते. त्यानंतर २०२०मध्ये सिंह गणना होणं अपेक्षित होतं. मात्र, ही गणंना होऊ शकली नाही. दरम्यान २०२०मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या गणनेच्या आधारावर गीरमध्ये ६७४ सिंह असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तर, सिंहाच्या वंशांच्या वाढीचा दर लक्षात घेऊन यंदा गीरमध्ये ७२६ सिंह असल्याचा अंदाज बांधण्यात आलाय. ही वाढ १० टक्के असल्याचं वन विभागाकडून गृहीत धरण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola