Gujarat Saman Nagari Kayada : गुजरातमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणार?

गुजरात सरकार राज्यात ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी दिली. याचाच एक भाग म्हणून गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले की राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीचं गठण केलं जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. तसेच या समितीत तीन ते चार इतर सदस्य असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola