Kharif Crops MSP : केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ
Continues below advertisement
केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.
Continues below advertisement