India Lockdown | केंद्र सरकारकडून दुकानांसाठी सशर्त परवानगी; काय आहे सरकारचा निर्णय?

 देशभरात लॉकडाऊनमध्ये  केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे.

महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत.  आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच  कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा नियम घातला आहे. मोठी दुकानं तसेच विविध ब्रँडची मॉलसारखी दुकानांना ही सवलत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola