Edible oil Prices : खाद्यतेलाचे दर लीटरमागे 8-12 रुपयांनी कमी करण्याचे आदेश
Continues below advertisement
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने तेल कंपन्याना दिले आहेत. खाद्यतेलाचे दर लीटरमागे ८ ते १२ रुपयांनी कमी करण्याचे आदेश आहेत. त्याचवेळी तूर आणि उडीद डाळींचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यांवर मर्यादा घातलीय. किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टन, घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन, मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर पाच टन आणि गोदामात २०० टन तसेच डाळ मिलसाठी एकूण क्षमतेच्या २५ टक्क्यांपर्यंत साठा करण्यास परवानगी असणार आहे. ही मर्यादा ३१ ऑक्टोबरपर्यंत घालण्यात आलीय.
Continues below advertisement