Coronavirus | सरकारने शेतकरी, मजूर,गरिबांच्या खात्यात 7500 रुपये आर्थिक मदत जमा करावी : सोनिया गांधी

Continues below advertisement
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी देश लॉकडाऊन आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. अशा कठीण प्रसंगात सर्वाधिक हाल कष्टकरी वर्गाचे होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करावेत," असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसंच देशभरात कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "सध्या आपल्याला सगळ्यांनी मिळून कोरोना व्हायरसविरोधात लढण्याची गरज असताना भाजप द्वेषाचा विषाणू पसरवत आहे," असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram