Karnataka : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्यांचा प्रताप, राज्यपालांसाठी थेट धरणातून सोडलं पाणी

Continues below advertisement

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून अधिकाऱ्यांनी चक्क धरणातून पाणी सोडल्याचा प्रकार घडलाय. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग वॉटरफॉल पाहता यावा यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रताप केलाय.धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्यांनी यासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती.राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकाऱ्यांनी हा कारनामा केला आहे. कर्नाटकातल्या शरावती नदीवर 151 टीएमसी क्षमतेचं मोठं धरण आहे..या घरणाच्या जवळपास प्रसिद्ध ‘जोग फॉल्स’ हा धबधबा आहे. हा धबधबा पाहायला राज्यपाल जाणार होते. राज्यपालांना धबधबा पाहता यावा यासाठी अधिकाऱ्यांनी मनमानी करत नदीकाठच्या लोकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शरावती नदीमध्ये पाणी सोडलं. दरम्यान धरणात पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची आता चौकशी करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram