Vaccination :भारतात 100 कोटी लसीकरण पूर्ण, लसोत्सवानिमित्त 100 ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई!
Continues below advertisement
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकारणामध्ये कार्यरत असणारे प्रवीण गेडाम यांच्याशी केलेली ही खास बातचीत. यानिमीत्त देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई केली गेली. यात दिल्लीतील लाल किल्ला तसेच पुण्यातील शनिवार वाड्याचा ही समावेश होता.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Vaccination Vaccination Corona Narendra Modi 100 Crore Dose Historical Monuments Enlightened Monuments