Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha
Continues below advertisement
सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण केंद्र सरकारने आयात कर वाढवल्यानं सोने महागणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील बेसिक इंपोर्ट टॅक्स 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के एवढा वाढवला आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर घसरलाय. त्यामुळे आयात कमी करून व्यापारातील तूट भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Continues below advertisement