Goa : रात्री उशिरापर्यंत मुली घराबाहेर का होत्या? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल वादाच्या भोवऱ्यात
गोव्यात रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी फिरताना दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यावर त्या मुली रात्री का फिरायला गेल्या असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होतेय.